शुक्रवार, १८ डिसेंबर, २००९

फरकांची मज़ा !

तुझातल्या अन माझातल्या
त्या फरकांचिच तर मज़ा आहे
लीप अन सीप मधल्या
गॅपचीच तर ती सज़ा आहे. . .
तरी त्यातून सांडणार नाही
हयातच आमचा दर्जा आहे !

तू ओवरटाइम म्हणलास की
माझी मात्र रजा आहे . . .
तू शांततेत विरलास की
माझा सुरू बॅंड बाजा आहे. . .
चीड चीड झाली तरी हसतो
ह्यातही आमचा दर्जा आहे !

मी डोंगर पाहिला की
तुझी दरीची भाषा आहे
मी साडी नेसावी म्हणल
तर तुझी शॉर्ट्स-शर्ट ची आशा आहे !
ते काहीही असल तरी
आमची आघाडीची दिशा आहे !

मी आयुष्य सेंटी केल
की तुझी पंचट जोक आहे
मी पुरणपोळी म्हणल की
तुला आठवतो कोक आहे . . .
ते काहीही असल तरी
तुझाकड़ेच माझा रोख आहे !


तू जरी गोल्फ खेळलास तरी
माझी दांडू आणि विट्ट्टी आहे
तू प्रोफीषनल हो म्हणलास तरी
माझी पार्टी आन् किटी आहे !
ते काहीही असला तरी
तुझी न् माझीच मिठी आहे ! ! :P

P.S : Please do not mind any grammatical mistakes !
The poem is purely imaginary and any co-incidence is accidental!

८ टिप्पण्या:

  1. Lovely.. Bhari lihiliyes hi..
    And the marathi typing is surely improving.. :)

    उत्तर द्याहटवा
  2. शेवट जमलाय ! माझ्या मते, फरकातच मजा असते. सगळे सारखे असले तर आयुष्य कंटाळवाणे होईल.

    उत्तर द्याहटवा