शनिवार, १२ डिसेंबर, २००९

मनाचा राक्षस

माझा मनातल्या राक्षसाला आज बांधून ठेवलय...
पुर्वी जरा गाडी घसरली
की त्याची तिथे हजेरीच लागली
पुर्वी मला जरा बोलिंग जमली
की त्यानी बॅटच फिरवली...
मात्र आता
आता त्याला घाबरवायला मी सुरीच नाही तलवारच काढली



माझा मनातल्या राक्षसाला आज बांधून ठेवलय...
पुर्वी जरा पाय पसरले
की गोधडी अपरीच पडली
पुर्वी जरा सूर ताल जमले
की समजा उद्या सर्डीच झाली
मात्र आता
आता त्याला घाबरवायला मी सुरी नाही तलवारच काढली


माझा मनातल्या राक्षसाला आज बांधून ठेवलाय...
पुर्वी क्वीन पॉकेटात गेली
की कवर नी धोकाधडीच केली
पुर्वी चार पेपर भारी गेले
की समजा पाचव्यानी लाथच मारली
मात्र आता
आता त्याला घाबरवायला मी बंदुकीची गोळीच चालवली

पुर्वी मन अन् राक्षसाची जुगलबंदी झाली
मनावर सरळ एक भेंडीच चढली
मात्र आता
आता मन आणि राक्षस यांची आखद्यात कुस्तीच मांडली
अन् आज मनाने लव गेमच झिंकली :)

६ टिप्पण्या: