सोमवार, १५ जुलै, २०१३

मेकप

मेकप

मेकप पाठचा माणुस शोधयला फार प्रयास पडतात.
क्वचीतच मात्र माणुस आपला मेकप करण विसरुन जातो ...
ही साली सिचुएशनच बेकार!
एखदीचे  डोळे आपल्याला इतके काही खिळावतात मेकप करशिल खबरदार,
सारखे  सारखे  बजात !

 - गद्यापंचविशी

सोमवार, ५ मार्च, २०१२

पत्यांचा बंगला

    एका अलिशान बंगल्यात, खूप गर्दी जमली होती, मी ही तिथे होतो. बाबा कोणाशी तरी बोलत होते "घर बंधल अणि लग्न केल की नेमक काय ते कळत ! ..." देव जाणे काय बोलत होते. तेवढ्यात माझा लक्ष त्यांचा पांढरे केस अणि डोक्यावरच टक्कल या कडे गेले होते. ते पुढे बोलतच होते " अभ्या तुला सांगतो आधी एक छोटस अप्ल्यापुर्त राहत घर कराव अशी सुरुवात केली, पण पुढे पुढे सगळयनी एकत्र रहाव अणि लागतील अशा सर्व सुखसोयी असाव्या, अस करत आवर घालताना इतक सार  अवघड झाली काय सांगू !"
   मी एका कोपर्यात पत्यांचा कॅट घेउन कात्री मारत बसलो होतो. "अरे पण आयुष्यात एकदाच घर बांधतो आपण, झकास बांधाव अस मनात होत !" इथे मी पत्यांचा बंगला बनवायला सुरुवात केली होती. पहिला माळा  झाला होता पण बाबांचा हा "एकदाच बांधतो " डायलोग  ऐकून तळ मजला अजुन मोठा करायची हुक्की आली. अक्सटेंशन  करण्याचा नादात सार ढआसळल होत!
     पाहिले पाढे पंचावन...पुन्हा तळ मजला ह्या वेळी वा-याची झुळुक आणि पत्यांनी उड्या मारून जीव दिला होता. उघड्या खिड़कीकडे मी रागाने कटाक्ष टाकला, जणू ती घाबरून बंद होणार होती. आपल्या मनो-याला हे वास्तुशास्त्र लाभत नाही अस समजुन मी दिशा बदलली!
    मोठा तळ मजला, पहिला मजला, दूसरा मजला इतक्यात नीलू आला आणि म्हणे "दादा, अरे ते तळ मजल्याच मधल पान अलगद काढल ना, तरी बंगला पडत नाही, दाखवू? " त्याने प्रश्न नावालाच विचारला होता मी काही बोलायचा आत, पान ओढू पहणारे त्याचे थरथरणारे हात बंगल्याला उध्वस्त करून गेले होते! इतके झाले त्यापुढे तो म्हणाला " अरे ठीके ना, पडला तर पडला,  मागचा वेळेस  नाही का, मी बंगला बनवत होतो आणि तू गुदगुल्या केल्या, हसवत होतास, चिडवत होतास. आईने जशास तशे गोष्ट सांगितली होती ना? तेच समाज "
मी :"अरे नीलू पण अप्तेष्ठअन मधे नव्हे ...." अस मी म्हणे पर्यन्त छोटे राजे  फरार झाले होते. बहुदा "आप्त-इष्ठ म्हणजे तरी कोण?" अस प्रश्न माझा मनात तरळून गेल होता!
    इतक मात्र नक्की, बंगला गडगडून उतरताना, पडणा-या मजल्यान्कडे पहिला की हात डोळ्यातले अश्रु टिपायला  सरसावत असत. अगदी त्या उलट सगळा कोलमाडत असताना उर्वरित मळ्यांकडे पाहिले तर मन दिलासा देत ओठांवर स्मित हास्य फुटे . आणि इतक्यात मन शांत होत नसे, पुन्हा ती होऊ देणार नाही ह्या मागे रंगत असायच !
    मी बनवत असलेला बंगला कित्येक जण कानाडोळा करत असे, माझा अखंड प्रवास बघणारे आजोबा पाठीवर थाप मारून गेले होते, इतर काहिनी पत्ते पायदळी उडवले होते. आधीच निम्मा कॅट  माझा हातात होता, त्यातली  निम्मी  पाने आणि नेमके एक्के उडाले होते. श्या! कोणताही खेळ असो मला एक्के हवे असत. पण बंगला काही खेळ नव्हता, प्रत्येक पान समानच होत, मजला उभा करणा-या पत्याच काही मूल्यमापन नव्हत. तळ मजला राजानी संभाळला म्हणजे तो पडणार नाही अस नव्हतच! जीव मुठीत धरून सोफ्याखाली, हॉलमधे, दारामागे , अंगाणात सगळी कडे शोध मोहिम सुरु होती! हरवलेली  पाने ह्याने अश्रु अनावर झाले होते. पापण्यांवरुन हळूच गालांवर अवतरले होते . काळाने अनुभवाचा रुमालाने अलगद अश्रु टिपून घेतले होते! हताश होऊन जागेवर येऊन  बसलो होतो.
    एकवार नजर बंगल्यावर पडली, शेवटचा मजला राहिला होता. हातानी पान ओढली, ओल्या नजरेनी एकवार पानांकडे पाहिले  बदामची राणी आणि बदमचा राजा हातात होते! हाताला घाम फुटत होता, काळीज  जोरात ठोठावत होते! पूर्ण बंगल्यातुन नझर फिरवली, कोपर्यातला एक पत्ता बंगला सोडून गेला होता तरी बंगला निमूटपणे उभा होता. एक अश्रुही न ढाळता दुख गिळून घेतल होता. कोण जाणे का पण माझी आता नझर त्या मागचा भिन्तिने रोखून धरली होती....ह्या एका पुढचा क्षणात पूर्वेकडे बघत असणार्या तिने माझा बंगल्यात नारायणाचा प्रकाश नाकारला, आणि दक्षिणायनम: केली तर ? एका क्षणात ती अदृश्य झाली तर ? ह्या सगळ्यात तिची साथ किती मी किती गृहीत धरली होती.........
     त्या अलिशान बंगल्यात, त्या गर्दीच्या कल्लोळात, फक्त मी, राजा, राणी, ती भिंत आणि ते पत्याचे साथी बहुदा एकाच गाण गुणगुणत होतो - 
कुणाचा खांद्या वर कुणाचे ओझे .... 
माला मात्र काही ओळी अगदी थेट ऐकू आल्या 
... 
जीवनाशी घेती पैजा कोठून घोकून 
म्हाणती हे वेडे पिसे तरी आम्ही राजे ...... !!  

बुधवार, १३ एप्रिल, २०११

बाप्पा

आज तुझ्या देवळात मी 
बघतोय नजर रोखून 
पायऱ्या चढणारा शूर मी   
शरणलो तलवार फेकून 
पुन्हा एकदा देना बाप्पा 
फक्त धार भारी करून 
शप्पथ तुझी आता मी 
लढाई येईन जिंकून 

आज तुझ्या दारात पुन्हा 
बघतोय रे नजर रोखून 
पायऱ्या चढणारा संसारी मी 
आलोय एकटाच नाती सोडून 
पुन्हा एकदा देना बाप्पा 
घट्ट गाठी बांधून 
शप्पथ तुझी आता मी 
गाठी ठेवीन नक्की जपून !

आज तुझ्या दारात पुन्हा 
बघतोय नजर रोखून 
पायऱ्या चढणारा हिशोबी मी 
आलोय खाती सोडून 
पुन्हा एकदा देना बाप्पा 
चुकलेला हिशोब झटपट सोडवून 
शप्पथ तुझी आता मी 
आकडे ठेवीन दरोज मोडून !

आज पुन्हा दारात तुझ्या
बघतोय नजर रोखून 
पायऱ्या चढणारा जुगारी मी 
आलोय डाव अर्धा सोडून 
पुन्हा एकदा देना बाप्पा 
सगळी रमी  जमवून 
शप्पथ तुझी आता मी 
अड्यावर येणार नाही पुन्हा वळून !

पुन्हा पुन्हा दारात तुझ्या 
बघतोय रे नजर रोखून 
पायऱ्या चढणारा दुखी मी 
आलोय अश्रू पुसून 
पुन्हा एकदा देना बाप्पा 
ते सारं स्वप्नाप्रमाणे रंगवून 
शप्पथ तुझी आता मी 
पाहणार नाही डोळे उघडून! 

बास झाला दारात तुझ्या 
शेवटची नजर आहे रोखून 
कारण , पायऱ्या चढतानाच याचकाचा मी 
आलोय गळा दाबून 
नको आता काही बाप्पा 
तू आहेस ना माझात सामावून ?
शप्पथ तुझी आहे मात्र 
शोधून काढीन तुला माझ्या अंतरातून !!!

गुरुवार, ६ जानेवारी, २०११

दिवस सरले होते ..........

लहानगे होते तेव्हा
दिवस किती सोपे होते ,
जिंकलो वा हारलो
असे कधीच काही रंग नव्हते.
प्रत्येक क्षण जणू काही
पेन्सिलनी अलगद आखले होते
चुकल्यावाणी वाटल्यावर,
खोडरब्बरनी संपूर्ण मिटवले होते...
उद्या सकाळी उठल्यावर
खोडलेले काहीच दिसत नव्हते.
संपूर्ण चित्र रंगवल्यावर,
दर्जा ठरवण्याचे हट्ट नव्हते.
पेन्सिल घेऊन नवे चित्र
अन् क्षणामधे रमणे होते.........

काय कसे कोण जाणे पण
दिवस पटकन सरले होते
चिमुकले हात मोठे होऊन
आता, घट्ट बॉलपेन धरले होते
प्रत्येक क्षण जणू काही
बॉलपेन नी गडद कोरले होते
चुकल्यावाणी वाटले तरी,
खोडणे अगदी अशक्य होते
उद्या सकाळी उठल्यावर
सर्व तसेच (मन) पटलावर होते
संपूर्ण चित्र रेखाटल्यावर
अपेक्षानचे गुंतलेले घरटे होते
पेन घेऊन जुनेच चित्र,
मोठे हात आज अजुन गुंतवत होते !


नव वर्ष सुरू झाल आणि नवीन काही लिहाव अस ठरवल होत. फार दिवस झाले तरी नक्की काय ते कळले नव्हत. आज जुनी घरटी जाळून , नवीन कागदावर मोठ्या हातांनी पेन्सिल घेऊन लिहिताना
- मृणाल

रविवार, १२ सप्टेंबर, २०१०

... असाही एक दिवस ....

आयुष्यात कधी असाही दिवस यावा
की दिवस जसा आला तसा जावा
पण एक दिवस असाही गुंफववा
की वेळ का जात नाही त्यासाठी मनात गोंगाट व्हावा !

आयुष्यात कधी असाही दिवस यावा
की मी-मला-माझा असा माज असावा
अस पुढे चालताना , एक असाही दिवस उजेडवा
जेव्हा तू-मी- आपण-सगळे त्या दुष्टाचा तुकडा पाडवा !

आयुष्यात कधी असाही दिवस यावा
मी टॉम आणि जेरी दोस्त व्हावा
दोघांना घरात उचछाद मांडावा
अस करता करता टॉम एकदिवस चॅप्टर व्हावा !

आयुष्यात एक श्रावणाचा दिवस असावा
मी रिमzइम पाउस आणि तू भेदनारा सूर्य किरण जाणवावा
आपण लपाछपीचा आनंद घेताना
इंद्रधनुष्याने अलगद अप्रतिम रंग द्यावा !

आयुष्यात एक श्रावणाचा दिवस असावा
की मी जादुगार आणि आयुष्य जादूचा प्रयोग व्हावा
प्रतेक खेळात यशस्वी होताना
' फक्त एकदाच ' मोठा पोपट व्हावा !!

आयुष्यात एक श्रावणाचा दिवस असावा
सिर्कशीतला पडद्यामागचा विदूषक दिसावा
एकत्र चालताना बोलताना ह्सताना अचानक
त्याच्या डोळ्यानंतला अश्रूंसाठी माझा खांदा आधार वाटावा !!

आयुष्यात एक  दिवस असावा
की सगळ्या दिवसांचा ओवून मी एक हार बनवावा
हा हार लिलावात जर मंडलास
तर ह्या जगात विकत घेण्यास कोणीच पात्र नसावा !!!

सोमवार, २३ ऑगस्ट, २०१०

At the break of dawn . . . .

Its that time when its not dark neither bright.A Pessimist sees it more of dark but the hope within pulls him to other side of the rope. Its a tug-of-war where who wins is still unknown! But we all believe that the hero always wins , the sun always shines !
Wait a minute , sit back ....
Have we taken sun for granted to rise and shine ?
Here comes the point ,
When we start taking life for granted ,
when you feel u are in command of situation ,
when you have conquered all fears ,
when you are comfortable with the compromises ,
when you have compliments under your belt ,
when you are oxygenated by your family , frnz , n most important people of life ...
and you are 'almost ' there on the top ....
just about to lift a championship trophy  ,

And ,
you are slapped tightly right across your face to know it was a dream life . Your googly-woogly-wush cheeks of yesterday have become rosier than ever before in reality !
It was when you felt noting can get better than this but you forgot to enjoy it to the hilt because it slipped from your mind that it can definitely get worse !

Today , here you are lying on your bed finding when it all begun ,
where
overconfidence overtook confidence ,
where
self respect crossed lines to reach pride ,
and
eventually , have brought you from somebody to nobody !

It has become a reverse journey from leaps and jumps to baby steps !!
Hey but did u forget , you were the driver !!
One thing is purely true ,
you can turn bankrupt in all possible ways but somethings dont change - love from most important people of life and surely the sprit of life , the perspective you look from ! And to end it in style ,


जिंदगी है तो ख्वाब है
   ख्वाब है तो मंज़िले है
मंज़िले है तो फ़ासले है
  फ़ासले है तो रास्ते है
रास्ते है तो मुश्किले है
  मुश्किले है तो हौसला है
हौसला है तो विश्वास है
  क्योंकि फाइटर हमेशा जितता है !!

( P.s : ( w.r.t to my blog name and its description )
   This should have been my introductory blog to fit its name. Mayb , this is a start of it in true sense !
   They say , " When everything ends its a new beginning of something really wonderfull ! )

रविवार, १५ ऑगस्ट, २०१०

आयुष्य

Hey Guys ,
Its my blog update after long , feels nice to write ! Hey this post is kinda heavy , all those delicate darlings can keep away :P ..Anyways , enjoy !!

आयुष्यात कधी काही मागायच नसत ..
लक्षात ठेव मित्रा ,
ते सर्व उधारीच असत!

जे हव असेल ते क्रियेट करायच असत
जे तू घडवलस ते माझ म्हणून मिरवायच असत!
मिरवता मिरवता त्याने जर मागून घेतल शस्त्र ,
' का कुठे ' ना विचारता समर्पण करायच असत!

आयुष्य हे शायर आणि आपण इर्शाद म्हणायच असत,
शायरी आवडली नाही तरी ' वाह वाह ! ' म्हणायच असत !
म्हणून त्याने काहीही ऐकवाव आणि मी ऐकाव अस नसत
तरीही ,
आयुष्य हे शायर आणि आपण इर्शाद म्हणायच असत !


आयुष्य ते रथचालक आणि तू नगरीचा स्वामी व्हयायच असत ,
तू अद्न्या दिलीस की त्याने तिथेच नेna अपेक्षित असत !
तरीही,
त्याचा हातात लगाम आहे हे विसरूनच जग फसत ,
तरी आयुष्य ते रथचालक आणि तू नगरीचा स्वामी व्हयायच असत !


आयुष्य ते लाटा आणि आपण किनार व्हायच असत ,
दोघांनी मिळून प्रवाशांना खुष करायच असत !
भरती आणि ओहोटी दोन्हीला साथ द्यायच असत ,
म्हणून काय त्याने वादळाच विद्रूप रूप दाखवायच असत ?

आयुष्याने धनुष्य आणि आपण बाण  व्हायचा असत ,
बाणाने तर आकाश भेदन्याचा स्वप्न बघायच असत !
म्हणून का धनुष्याने कुवत नाही तेवढा ताnaयाच असत ?
असा असेल तर आकाश तर दूर , धारतीवरच मोडून पडाव लागात !

म्हणजे आयुष्याची मनमर्जी
आणि आपण काय compromise करायच असत ?
तस नाही ,
तरी दोघांनी बेदुन्ध होऊन रिंगणात झोकून द्यायच असत !