सोमवार, ५ मार्च, २०१२

पत्यांचा बंगला

    एका अलिशान बंगल्यात, खूप गर्दी जमली होती, मी ही तिथे होतो. बाबा कोणाशी तरी बोलत होते "घर बंधल अणि लग्न केल की नेमक काय ते कळत ! ..." देव जाणे काय बोलत होते. तेवढ्यात माझा लक्ष त्यांचा पांढरे केस अणि डोक्यावरच टक्कल या कडे गेले होते. ते पुढे बोलतच होते " अभ्या तुला सांगतो आधी एक छोटस अप्ल्यापुर्त राहत घर कराव अशी सुरुवात केली, पण पुढे पुढे सगळयनी एकत्र रहाव अणि लागतील अशा सर्व सुखसोयी असाव्या, अस करत आवर घालताना इतक सार  अवघड झाली काय सांगू !"
   मी एका कोपर्यात पत्यांचा कॅट घेउन कात्री मारत बसलो होतो. "अरे पण आयुष्यात एकदाच घर बांधतो आपण, झकास बांधाव अस मनात होत !" इथे मी पत्यांचा बंगला बनवायला सुरुवात केली होती. पहिला माळा  झाला होता पण बाबांचा हा "एकदाच बांधतो " डायलोग  ऐकून तळ मजला अजुन मोठा करायची हुक्की आली. अक्सटेंशन  करण्याचा नादात सार ढआसळल होत!
     पाहिले पाढे पंचावन...पुन्हा तळ मजला ह्या वेळी वा-याची झुळुक आणि पत्यांनी उड्या मारून जीव दिला होता. उघड्या खिड़कीकडे मी रागाने कटाक्ष टाकला, जणू ती घाबरून बंद होणार होती. आपल्या मनो-याला हे वास्तुशास्त्र लाभत नाही अस समजुन मी दिशा बदलली!
    मोठा तळ मजला, पहिला मजला, दूसरा मजला इतक्यात नीलू आला आणि म्हणे "दादा, अरे ते तळ मजल्याच मधल पान अलगद काढल ना, तरी बंगला पडत नाही, दाखवू? " त्याने प्रश्न नावालाच विचारला होता मी काही बोलायचा आत, पान ओढू पहणारे त्याचे थरथरणारे हात बंगल्याला उध्वस्त करून गेले होते! इतके झाले त्यापुढे तो म्हणाला " अरे ठीके ना, पडला तर पडला,  मागचा वेळेस  नाही का, मी बंगला बनवत होतो आणि तू गुदगुल्या केल्या, हसवत होतास, चिडवत होतास. आईने जशास तशे गोष्ट सांगितली होती ना? तेच समाज "
मी :"अरे नीलू पण अप्तेष्ठअन मधे नव्हे ...." अस मी म्हणे पर्यन्त छोटे राजे  फरार झाले होते. बहुदा "आप्त-इष्ठ म्हणजे तरी कोण?" अस प्रश्न माझा मनात तरळून गेल होता!
    इतक मात्र नक्की, बंगला गडगडून उतरताना, पडणा-या मजल्यान्कडे पहिला की हात डोळ्यातले अश्रु टिपायला  सरसावत असत. अगदी त्या उलट सगळा कोलमाडत असताना उर्वरित मळ्यांकडे पाहिले तर मन दिलासा देत ओठांवर स्मित हास्य फुटे . आणि इतक्यात मन शांत होत नसे, पुन्हा ती होऊ देणार नाही ह्या मागे रंगत असायच !
    मी बनवत असलेला बंगला कित्येक जण कानाडोळा करत असे, माझा अखंड प्रवास बघणारे आजोबा पाठीवर थाप मारून गेले होते, इतर काहिनी पत्ते पायदळी उडवले होते. आधीच निम्मा कॅट  माझा हातात होता, त्यातली  निम्मी  पाने आणि नेमके एक्के उडाले होते. श्या! कोणताही खेळ असो मला एक्के हवे असत. पण बंगला काही खेळ नव्हता, प्रत्येक पान समानच होत, मजला उभा करणा-या पत्याच काही मूल्यमापन नव्हत. तळ मजला राजानी संभाळला म्हणजे तो पडणार नाही अस नव्हतच! जीव मुठीत धरून सोफ्याखाली, हॉलमधे, दारामागे , अंगाणात सगळी कडे शोध मोहिम सुरु होती! हरवलेली  पाने ह्याने अश्रु अनावर झाले होते. पापण्यांवरुन हळूच गालांवर अवतरले होते . काळाने अनुभवाचा रुमालाने अलगद अश्रु टिपून घेतले होते! हताश होऊन जागेवर येऊन  बसलो होतो.
    एकवार नजर बंगल्यावर पडली, शेवटचा मजला राहिला होता. हातानी पान ओढली, ओल्या नजरेनी एकवार पानांकडे पाहिले  बदामची राणी आणि बदमचा राजा हातात होते! हाताला घाम फुटत होता, काळीज  जोरात ठोठावत होते! पूर्ण बंगल्यातुन नझर फिरवली, कोपर्यातला एक पत्ता बंगला सोडून गेला होता तरी बंगला निमूटपणे उभा होता. एक अश्रुही न ढाळता दुख गिळून घेतल होता. कोण जाणे का पण माझी आता नझर त्या मागचा भिन्तिने रोखून धरली होती....ह्या एका पुढचा क्षणात पूर्वेकडे बघत असणार्या तिने माझा बंगल्यात नारायणाचा प्रकाश नाकारला, आणि दक्षिणायनम: केली तर ? एका क्षणात ती अदृश्य झाली तर ? ह्या सगळ्यात तिची साथ किती मी किती गृहीत धरली होती.........
     त्या अलिशान बंगल्यात, त्या गर्दीच्या कल्लोळात, फक्त मी, राजा, राणी, ती भिंत आणि ते पत्याचे साथी बहुदा एकाच गाण गुणगुणत होतो - 
कुणाचा खांद्या वर कुणाचे ओझे .... 
माला मात्र काही ओळी अगदी थेट ऐकू आल्या 
... 
जीवनाशी घेती पैजा कोठून घोकून 
म्हाणती हे वेडे पिसे तरी आम्ही राजे ...... !!  

३ टिप्पण्या: