गुरुवार, ६ जानेवारी, २०११

दिवस सरले होते ..........

लहानगे होते तेव्हा
दिवस किती सोपे होते ,
जिंकलो वा हारलो
असे कधीच काही रंग नव्हते.
प्रत्येक क्षण जणू काही
पेन्सिलनी अलगद आखले होते
चुकल्यावाणी वाटल्यावर,
खोडरब्बरनी संपूर्ण मिटवले होते...
उद्या सकाळी उठल्यावर
खोडलेले काहीच दिसत नव्हते.
संपूर्ण चित्र रंगवल्यावर,
दर्जा ठरवण्याचे हट्ट नव्हते.
पेन्सिल घेऊन नवे चित्र
अन् क्षणामधे रमणे होते.........

काय कसे कोण जाणे पण
दिवस पटकन सरले होते
चिमुकले हात मोठे होऊन
आता, घट्ट बॉलपेन धरले होते
प्रत्येक क्षण जणू काही
बॉलपेन नी गडद कोरले होते
चुकल्यावाणी वाटले तरी,
खोडणे अगदी अशक्य होते
उद्या सकाळी उठल्यावर
सर्व तसेच (मन) पटलावर होते
संपूर्ण चित्र रेखाटल्यावर
अपेक्षानचे गुंतलेले घरटे होते
पेन घेऊन जुनेच चित्र,
मोठे हात आज अजुन गुंतवत होते !


नव वर्ष सुरू झाल आणि नवीन काही लिहाव अस ठरवल होत. फार दिवस झाले तरी नक्की काय ते कळले नव्हत. आज जुनी घरटी जाळून , नवीन कागदावर मोठ्या हातांनी पेन्सिल घेऊन लिहिताना
- मृणाल