रविवार, १२ सप्टेंबर, २०१०

... असाही एक दिवस ....

आयुष्यात कधी असाही दिवस यावा
की दिवस जसा आला तसा जावा
पण एक दिवस असाही गुंफववा
की वेळ का जात नाही त्यासाठी मनात गोंगाट व्हावा !

आयुष्यात कधी असाही दिवस यावा
की मी-मला-माझा असा माज असावा
अस पुढे चालताना , एक असाही दिवस उजेडवा
जेव्हा तू-मी- आपण-सगळे त्या दुष्टाचा तुकडा पाडवा !

आयुष्यात कधी असाही दिवस यावा
मी टॉम आणि जेरी दोस्त व्हावा
दोघांना घरात उचछाद मांडावा
अस करता करता टॉम एकदिवस चॅप्टर व्हावा !

आयुष्यात एक श्रावणाचा दिवस असावा
मी रिमzइम पाउस आणि तू भेदनारा सूर्य किरण जाणवावा
आपण लपाछपीचा आनंद घेताना
इंद्रधनुष्याने अलगद अप्रतिम रंग द्यावा !

आयुष्यात एक श्रावणाचा दिवस असावा
की मी जादुगार आणि आयुष्य जादूचा प्रयोग व्हावा
प्रतेक खेळात यशस्वी होताना
' फक्त एकदाच ' मोठा पोपट व्हावा !!

आयुष्यात एक श्रावणाचा दिवस असावा
सिर्कशीतला पडद्यामागचा विदूषक दिसावा
एकत्र चालताना बोलताना ह्सताना अचानक
त्याच्या डोळ्यानंतला अश्रूंसाठी माझा खांदा आधार वाटावा !!

आयुष्यात एक  दिवस असावा
की सगळ्या दिवसांचा ओवून मी एक हार बनवावा
हा हार लिलावात जर मंडलास
तर ह्या जगात विकत घेण्यास कोणीच पात्र नसावा !!!